रात्री दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या महिलेचा विनयभंग




केज:- लाईट नसल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून एक महिला व तिच्या दोन मुली झोपलेल्या असताना मध्यरात्री त्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे.

दि. २२ मे रोजी रात्री लाईट नसल्यामुळे केज शहरातील एका उपनगरात राहत असलेली एक विविहित महिला ही तिच्या दोन मुलीना सोबत घेऊन घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपल्या होत्या. त्यावेळी रात्री सुमारे ११:४५ वा. च्या सुमारास दीपक वैजनाथ लांडगे याने घरात घुसून त्या विवाहित महिलेचा वाईट हेतुने हात धरला. याचा जाब विचारण्यासाठी ती महिला दीपक लांडगे याच्या घरी गेली असता तिला दीपक लांडगे यांच्या घरातील दोन महिलांनी धक्काबुक्की केली.

पीडित महिलेच्या तक्रारी वरून दि. २४ मे  रोजी दीपक लांडगे यांच्यासह त्याच्या कुटुंबातील दोन महिला विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ३१७/२०२६ भा न्या सं ७४, ११५(२), ३३३, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे हे तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...