इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

शिवाजी शिंदे यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; हल्ल्याचे कारणही आले पुढे


परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

येथील मोंढा मार्केट भागातील 'रिद्धी-सिद्धी' हॉटेलवर किरकोळ कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने (कत्तीने) जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्ल्यात शिवाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी आता संभाजी नगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शंकरराव शिंदे (वय ५०, रा. वडगावदाडाहरी, ता. परळी) यांचे मोंढा मार्केट परळी येथे 'रिद्धी-सिद्धी' हॉटेल आहे. त्यांच्या मुलाचे आरोपी गजानन सुरवसे याच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीकडून हा हल्ला करण्यात आला. २६ मे २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी गजानन सुरवसे आणि त्याची आई हॉटेलवर आले. आरोपी गजानन याने सोबत आणलेल्या तीक्ष्ण कोयत्याने (कत्तीने) शिवाजी शिंदे यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या उजव्या हाताच्या बोटावर, डाव्या पायाच्या मांडीवर आणि डाव्या हाताच्या दंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत. याचवेळी गजाननच्या आईने शिंदे यांच्या पत्नीचे डोक्याचे केस धरून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत मुक्का मार दिला. तसेच शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केली.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या शिवाजी शिंदे यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे उपचार घेत असताना त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये आरोपी गजानन सुरवसे आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या