दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

इमेज
जितेंद्र नव्हाडे यांना मातृशोक; सौ.नंदाबाई नव्हाडे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           येथील सेवानिवृत्त शिक्षक विलासराव नव्हाडे यांच्या पत्नी सौ नंदाबाई विलासराव नव्हाडे यांचे आज दि. 12 रोजी रात्री दहा वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव जितेंद्र नव्हाडे यांच्या त्या मातोश्री होत.      सौ. नंदाबाई विलास नव्हाडे  अतिशय मनमिळावू व कुटुंब वत्सल गृहिणी म्हणून सर्व परिचित होत्या. आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या 66 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नव्हाडे परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.   आज अंत्यसंस्कार      दरम्यान,नंदाबाई नव्हाडे यांच्या पार्थिवावर आज दि. 13 रोजी परळी वैजनाथ येथे मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्...

पॅरा स्विमर आभा मुंडेची पाच सुवर्णांची विजयी हॅट्रिक 

सलग तिसऱ्या वर्षी पॅरा स्विमर आभा गणेश मुंडेची सुवर्ण झेप; 5 सुवर्णपदके आणि 2 राष्ट्रीय विक्रमांची नोंद

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       परळी तालुक्यातील डाबी गावची सुवर्णकन्या तथा उदयोन्मुख पॅरा जलतरणपटू आभा गणेश मुंडे हिने 26 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत सलग तिसऱ्या वर्षी आपल्या सुवर्ण वर्चस्वाची मोहोर उमटवली आहे. बेंगळुरू येथील Zee Swim Academy येथे 8 ते 10 जून 2026 दरम्यान झालेल्या जुनियर व सब ज्युनिअर राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभाने सलग तिसऱ्या वर्षी तब्बल 5 सुवर्णपदके जिंकत 2 नवीन राष्ट्रीय विक्रमांची (National Records) नोंद आपल्या नावावर केली.

देशभरातील आठरा राज्यांमधील अव्वल पॅरा जलतरणपटूंच्या उपस्थितीत झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आभाने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्ण यश संपादन केले. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदकांची कमाई ( हॅट्रिक ) करून तिने भारतीय पॅरा जलतरण क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आभाने गेल्या तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण 15 सुवर्णपदकांची कमाई करत सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण केला आहे. तिची ही कामगिरी केवळ बीड जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

सध्या आभा बेंगळुरू येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पॅरा जलतरण प्रशिक्षक शरथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षण घेत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आभाच्या कामगिरीत सातत्याने उल्लेखनीय सुधारणा होत असून राष्ट्रीय स्तरावर ती नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड प्रक्रिया देखील पार पडत असल्याने आभाच्या या यशामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील संधी अधिक बळकट झाल्या आहेत. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारे ध्येयही गाठता येते,” हे आभा गणेश मुंडे हिने आपल्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या