ॲड. दत्तात्रय आंधळे संपादित जगमित्रनागा गाथेतील अभंग व आरती.

 इंदौर येथे संत जगमित्रनागा गाथेतील अभंग व आरतीचे सुमधुर गायन

इंदोर (प्रतिनिधी) – मराठी साहित्य अकादमी, मध्यप्रदेश यांच्या वतीने आयोजित ‘समरसतेचे संत’ या विशेष कार्यक्रमात संत साहित्याचा समृद्ध वारसा उलगडून दाखविण्यात आला. यावेळी संत वाङ्मयाचे संशोधक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांनी संपादित केलेल्या अत्यंत दुर्मिळ संत श्री जगमित्रनागा अभंगगाथेतील निवडक अभंगांचे सादरीकरण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक श्री निनाद आजगावकर यांनी केले.

या कार्यक्रमात डॉ. नेत्रा रावणकर लिखित ‘भारतीय दर्शनशास्त्र’, ‘पाश्चात्य दर्शनशास्त्र’ आणि ‘संत चोखामेळा’ या पुस्तकांचे प्रकाशन संत वाङ्मय संशोधक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास आषाढी-कार्तिकी वारी महामंडळाचे संचालक श्री संतोषजी गोडबोले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तसेच मध्यप्रदेश मराठा समाजाच्या अध्यक्षा सौ. अर्चना चितळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात संत जगमित्रनागा यांच्या अभंगांचे गायन श्री निनाद आजगावकर, सौ. नीरजा आजगावकर, कु. शाश्वती आजगावकर सुमधुर स्वरांत सादर केले.तबलासाथ कौस्तुभ दिवेकर यांनी  दिली.तसेच ह.भ.प. ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे रचित ‘संत जगमित्रनागा आरती’चे प्रभावी गायन श्री मंदार खराडे यांनी करून उपस्थितांची दाद मिळविली.

संत जगमित्रनागा यांच्या अभंगवाणीचा आणि समरसतेच्या संदेशाचा परिचय मध्यप्रदेशातील रसिकांना करून देणारा हा कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!