गळफास लावून शिक्षकाची आत्महत्या !
केज:- केज येथील सहशिक्षक सूर्यकांत बालासाहेब वाघमारे वय (४१वर्ष) रा. लव्हुरी ता. केज ह. मु. शाहू नगर केज यांनी कमल पेट्रोलियम या रमेश आडसकर यांच्या पेट्रोल पंपाचे बाजूचे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आत्मत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या केलेले शिक्षक सूर्यकांत वाघमारे यांची पत्नी सरकारी सेवेत असून त्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. दि. ९ जून रोजी रात्री ९:०० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा