इमेज
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले ! परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-       वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन  होऊन जात आहेत.        पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर...

 कर्णबधिर विद्यार्थिनी शाश्वती कांबळेची यशोगाथा : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या बळावर एसएससी बोर्डात प्रथम क्रमांक

परभणी | प्रतिनिधी

दिव्यांगत्व हे यशाच्या मार्गातील अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे स्व. रामराव कान्हेकर निवासी मूकबधिर विद्यालय, परभणी येथील विद्यार्थिनी शाश्वती माधव कांबळे (बिट्टू) हिने आपल्या उल्लेखनीय यशातून सिद्ध करून दाखविले आहे. कर्णबधिर दिव्यांगत्वावर मात करत शाश्वतीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एसएससी बोर्डामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शाश्वतीच्या या यशामुळे तिच्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली असून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. तिची जिद्द, कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचे हे यशस्वी फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रसंगी तिचे कौतुक करताना मान्यवरांनी सांगितले की, दिव्यांगत्व हे यशाच्या आड येत नाही. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण घेऊन आणि ज्ञानाची कसोटी पार करत उल्लेखनीय यश मिळविता येते, याचे जिवंत उदाहरण शाश्वती आहे. तिच्या या यशाने समाजातील अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.

शाश्वतीच्या सत्कारप्रसंगी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामुळे तिच्यावर सामाजिक जबाबदारीही वाढली असून, भविष्यातही याच जिद्दीने प्रगती करत स्वतःचा, पालकांचा, शाळेचा आणि समाजाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कान्हेकर, शाळेचे मुख्याध्यापक आर. जी. सोनवणे, तसेच शिक्षक प्रसाद कुलकर्णी, के. एल. शिंदे, आर. डी. लाशे, एस. डी. पोटभरे, ए. सी. हिंगोले, विठ्ठल घाटे, खरात सर, आळणे सर, कुंडकर, आगळे, अमोल, लहू पांढरे, राहुल राठोड, एस. पी. जायभाये, कोळेश्वर मॅडम, असोलेकर मॅडम, गवारी मॅडम, गाजरे मॅडम आणि कमल साळवे आदींनी शाश्वतीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शाश्वती कांबळे हिच्या या उल्लेखनीय यशामुळे स्व. रामराव कान्हेकर निवासी मूकबधिर विद्यालय,  परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, तिची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या