पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा नवा विक्रम ; ना. पंकजा मुंडे मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक




मुंबई दि. १० --

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी कारकिर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुंबादेवी मंदिरात जाऊन देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महाआरती केली.

 नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात जनादेशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून  पंतप्रधान म्हणून सर्वाधिक ४ हजार ३९९ दिवसांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे.​त्यांचा हा कार्यकाळ असाच उत्तरोत्तर वाढत जावो आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वात देशाच्या प्रगतीचा हा यशस्वी प्रवास अविरत सुरू राहो, अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुंबईची ग्रामदेवता, आई जगत्जननी श्री मुंबादेवीचे दर्शन घेत प्रार्थना केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!