तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

 परळीत महिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यास घरातून घेऊन जाऊन अमानुष मारहाण

परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

       परळी येथील  महिला महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यास त्याच्या राहत्या घरातून गाडीवर बसवून घेऊन जाऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल दि. ०९ जून २०२६ रोजी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी अनिल बाबुराव पत्की हे परळी येथील महिला महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.आरोपी वैजनाथ यादव (रा. परळी) याच्यासोबत त्यांचे मागील काही वर्षांपासून पैशांचे व्यवहार होते. दिनांक ०९ जून रोजी सकाळी १० वाजता आरोपी वैजनाथ यादव फिर्यादीच्या घरी आला. व्यवहाराच्या बहाण्याने त्याने फिर्यादीला आपल्या दुचाकीवर बसवून कॉलेज रोड, काळ रात्री मंदिर आणि धारावती परिसरात नेले. नदीच्या पलीकडे एका निर्जन झाडीमध्ये त्याने गाडी थांबवली. त्या ठिकाणी आरोपीचे  दोन अनोळखी साथीदार मोटारसायकलसह आले. तेथे आरोपी वैजनाथ यादव याने फिर्यादीला पैसे दे नाहीतर तुझा जीव घेईन'अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी बाजूला पडलेल्या लाकडी काठीने आणि बेल्टने फिर्यादीला पाठीवर, डोक्यावर व पायावर बेदम मारहाण केली. "जर आरडाओरडा केला किंवा पोलिसांत तक्रार केली, तर तुला जिवंत ठेवणार नाही," अशी धमकी देऊन आरोपींनी तिला दुपारपर्यंत तेथेच डांबून ठेवले. दुपारनंतर फिर्यादीला सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या अनिल पत्की यांनी नातेवाईकाना सांगितले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन आज सायंकाळी परळी शहर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!