परळी वैजनाथ शहरात १४ जुलै रोजी भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन
सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे आवाहन
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
आषाढी वारीनिमित्त परळी वैजनाथ शहरात मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीतील सर्व वारकरी तसेच वारकरी महिला भजनी मंडळांच्या सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळ व परळी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण यामुळे परळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. रिंगण सोहळा कॉटन मार्केट यार्ड (जत्रा मैदान), वेअरहाऊस शेजारी, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी सर्व वारकरी, भाविक, महिला भजनी मंडळे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा