प्रदिप अग्निहोत्री पुरोहित वैद्यनाथ मंदीर परळी वैजनाथ यांचा विशेष लेख......>>>>

परळीकरांचे 'लोकनेते' धनंजय मुंडे:  कामाचा माणूस अन् थेट जनसामान्यांशी नातं सांगणारं नेतृत्व




परळी वैजनाथ:महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धडाडीच्या आणि आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे नेते म्हणजेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे. मात्र, केवळ एक राजकीय नेता म्हणून नव्हे, तर परळी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा "आपला माणूस, कामाचा माणूस" म्हणून त्यांनी जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची जनतेशी असलेली नाळ. ते कितीही मोठे नेते किंवा मंत्री असले, तरी परळीतील प्रत्येक सामान्य नागरिकाशी त्यांचे संबंध कौटुंबिक आहेत. याचे सर्वात जिवंत आणि बोलके उदाहरण म्हणजे प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत पाहायला मिळते.धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात येतात, तेव्हा तिथल्या स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि भाविकांना राजकीय अंतर कधीच जाणवत नाही. मंदिरात आल्यावर ते तिथल्या ओळखीच्या माणसांना अगदी हक्काने, "आधी काय  देवा!" अशी प्रेमाने आणि जिव्हाळ्याने हाक मारतात. ही केवळ एक साधी हाक नसून, त्यात मतदारसंघातील लोकांबद्दल असलेला अथांग जिव्हाळा, आपुलकी आणि जमिनीशी जोडलेले नाते दिसून येते. एका मोठ्या नेत्याच्या तोंडून अशी आपुलकीची साद ऐकल्यावर कार्यकर्त्यांचा आणि सामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधिकच दृढ होतो.विकासकामांचा धडाका लावणारा नेता आणि सुख-दुःखात सोबत असणारा भाऊ अशा दोन्ही भूमिका धनंजय मुंडे यांनी उत्तम प्रकारे पेलल्या आहेत. याच आपुलकीमुळे आणि नेहमी कामाला तत्पर राहण्याच्या स्वभावामुळे आज परळीचा प्रत्येक नागरिक अभिमानाने म्हणतो, "आमचा नेता धनंजय मुंडे!" आगामी काळातही त्यांचे हे जनसामान्यांशी असलेले नाते परळीच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही..

- प्रदिप अग्निहोत्री 

पुरोहित, वैद्यनाथ मंदीर  परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...