ना. पंकजा मुंडे यांचा ३० ते २ ऑगस्ट बीड जिल्हा दौरा; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह विविध सार्वजनिक कार्यक्रमांना राहणार उपस्थित
मुंबई दि. २९ ---
राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे या ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान बीड जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीस त्या उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात विविध सार्वजनिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या भेटीगाठींचा समावेश आहे.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त अधिकृत दौऱ्यानुसार गुरुवार, ३० जुलै रोजी रात्री त्या मुंबईहून छत्रपती संभाजीनगरमार्गे बीड येथे दाखल होणार असून शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. ३१ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे होणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीस त्या उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी २ वा. सिरसाळा येथे आयोजित कै. वसंतराव नाईक सार्वजनिक जयंती महोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वा. परळी वैजनाथ येथील साठेनगर येथे आयोजित लोकनायक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वा. परळी वैजनाथ येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या निमंत्रितांचे कवी संमेलन कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत. २ ऑगस्ट रोजी सकाळी परळीहून अंबाजोगाईकडे प्रस्थान करून दुपारी १२ ते २ या वेळेत अंबाजोगाई येथील जनसंपर्क कार्यालयात अंबाजोगाई व केज मतदारसंघातील नागरिकांच्या त्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वा.त्या नांदेडमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा