लोककल्याणाच्या उपक्रमाबद्दल पंकजाताईंनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत व्यक्त केली कृतज्ञ भावना
ना.पंकजा मुंडे याच्या सामाजिक दायित्वाच्या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
हे माझ्यासाठी मोठे ऋण तयार झाले आहे - ना पंकजा मुंडे
लोककल्याणाच्या उपक्रमाबद्दल पंकजाताईंनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत व्यक्त केली कृतज्ञ भावना
परळी वैजनाथ : प्रतिनिधी
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आपला वाढदिवस खर्चिक व उत्सवी स्वरूपात साजरा न करता सामाजिक दायित्वाच्या उपक्रमातून साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनाला राज्यभरातून उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यभर लोक कल्याणकारी, पर्यावरणपूरक,सामाजिक हिताचे उपक्रम राबवून केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल 'हे माझ्यासाठी मोठे ऋण तयार झाले आहे' अशा शब्दात लोककल्याणाच्या उपक्रमाबद्दल पंकजाताई मुंडे यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली आहे. लोककल्याणाचा स्वीकारलेला मार्ग कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी राज्यभर रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान, रुग्णसेवा, शैक्षणिक साहित्य वाटप आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. वैयक्तिक सत्कार किंवा भव्य कार्यक्रमांऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यापूर्वीच केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यभरात ठीकठिकाणी लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत राबवलेल्या लोककल्याणकारी उपक्रमाबद्दल पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत कर्तव्य भावना व्यक्त केली आहे.
अशी आहे पंकजाताईंची आभाराची पोस्ट...
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, "माझ्या वाढदिवसानिमित्त आपण लोककल्याणकारी कार्यक्रम राबवून माझ्यासाठी प्रार्थना केल्या. हे माझ्यासाठी मोठे ऋण तयार झाले आहे. मी सदैव ऋणात राहीन. मी उतरणार नाही, मी मातणार नाही आणि मी घेतलेला वसा टाकणार नाही.". दरम्यान, या संदेशातून त्यांनी समाजसेवेची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. जनतेचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हेच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सूचित करत लोकहितासाठी अविरत कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा