अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला...

 "तू मला का बोलत नाहीस?" म्हणत अल्पवयीन मुलीवर विळ्याने जीवघेणा हल्ला ; पोक्सोअंतर्गत गुन्हा




अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला

परळी वैजनाथ| प्रतिनिधी..

    तालुक्यातील दादाहरी वाडगाव येथे १७ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या घरात घुसला. घरातील कडी लावून "तू मला का बोलत नाहीस?" असे म्हणत त्याने मुलीला खाली पाडले. तिच्या अंगावर बसून दोन्ही हातांनी गळा दाबला. त्यानंतर हातातील विळ्याने तिच्या डाव्या खांद्यावर वार करून तिला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी आकाश राम खाटीक रा. दादाहरी वडगाव याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ७५(१), ७६, ७८, १२७(२), ३३३, ३५१(२), ३५२ तसेच पोक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पिंक पथकाचे सपोनि. शेंडगे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

टिप्पण्या