लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारंभ...

ना. पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पत्रकार महादेव गित्ते यांचा विशेष गौरव



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्त साठेनगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार महादेव गित्ते यांचा विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

परळी वैजनाथ येथील साठेनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवात प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार महादेव गित्ते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महादेव गित्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताची पत्रकारिता करत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, धार्मिक तसेच लोकहिताच्या विविध प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली असून त्यांच्या कार्याची दखल घेत विविध सामाजिक संस्थांकडून यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. विविध पत्रकार संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणूनही ते सक्रिय असून समाजहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, अजय मुंडे, प्रा. विनोद जगतकर, वैजनाथराव सोळंके, भावड्या कराड, प्रा. पवन मुंडे, अय्युब खान पठाण, शकील कुरेशी, ॲड. वैजनाथ वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती अंजली माळी, नगरसेवक नितीन बागवाले, प्रवीण पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती–२०२६ चे अध्यक्ष सुनील मस्के यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमास नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सन्मानाबद्दल पत्रकार महादेव गित्ते यांनी आयोजक समिती तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार