विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप; शानूरभाई शेख यांच्या उपक्रमाचे कौतुक
पुणे : प्रभाग क्र. १७, रामटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये सामाजिक कार्यकर्ते शानू शेख यांच्या वतीने माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य, वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी उपमहापौर निलेश मगर आणि नगरसेविका हेमलता मगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शानूर शेख यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हाती घेतलेला हा शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, असे मत व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास अॅड. नासरजन हक्कानी, वसीम शेख, हाफिज फयाज मौलाना, प्राचार्या निखत , समीर शेख, उज्वला जाधव, अल्ताफ तांबोळी, नबी पटेल, मतिन शेख, मोहसीन सय्यद, सलमान शेख, शारिक खान, शादाब खान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा