शिक्षण क्षेत्रात पोकळी ; कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरवल्याची व्यक्त केली भावना

पद्मश्री डाॅ. डी. वाय. पाटील यांचे निधन ; ना. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

शिक्षण क्षेत्रात पोकळी ; कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरवल्याची व्यक्त केली भावना

मुंबई दि. ०४ ---

शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबातील जेष्ठ सदस्य हरवला असल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

     डॉ. डी.वाय. पाटील हे आमच्यासाठी कुटुंबातील जेष्ठ मार्गदर्शक होते. मुंडे साहेबांशी त्यांचा विशेष स्नेह होता. शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्था हे आदर्शवत आहे. शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने  त्यांना 'पद्मश्री' या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पाटील कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती इश्वराने द्यावी अशी प्रार्थना पंकजाताई मुंडे यांनी केली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..