परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात ४०,२६१ मतदारांची घट; उद्यापासून नव्या मतदार नोंदणीला संधी



परळी वैजनाथ : प्रतिनिधी
परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत मोठी घट झाल्याचे समोर आले असून, आजच्या तारखेपर्यंत तब्बल ४० हजार २६१ मतदारांची संख्या कमी झाली आहे. मतदार यादीच्या पुनरिक्षण प्रक्रियेनंतर ही घट झाल्याने आगामी काळात नव्याने मतदार नोंदणीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

उद्यापासून नवीन मतदार नोंदणी तसेच पहिल्या यादीत नाव राहून गेलेल्या पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील नावनोंदणीपासून वंचित असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मतदार यादीतील पुनरिक्षण प्रक्रियेमध्ये एका मतदाराचे नाव एकाच ठिकाणी असणे या नियमाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक ठिकाणी असलेली नावे कमी झाल्यानंतर मतदारसंख्येत घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे अनेक पात्र नागरिक अद्याप मतदार म्हणून नोंदणीकृत नसल्याने आगामी काळात नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव नसेल किंवा पहिल्या यादीत नाव राहून गेले असेल, तर नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नवीन मतदार नोंदणी अथवा नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

४० हजारांहून अधिक मतदारांची घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता नव्या मतदार नोंदणीची प्रक्रिया किती वेग घेते आणि अंतिम मतदार यादीत मतदारसंख्या किती राहते, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!