संजय क्षीरसागर यांनी केला सत्कार...

 डॉ. अरविंद गायकवाड यांची पदोन्नती; ‘प्रिव्हेंटिव्ह अन्कॉलॉजी’ पदावर नियुक्ती




छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. अरविंद गायकवाड यांची ‘प्रिव्हेंटिव्ह अन्कॉलॉजी’ या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दैनिक मराठवाडा साथीचे विशेष प्रतिनिधी संजय क्षिरसागर यांनी डॉ. अरविंद गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे प्रतिबंध, जनजागृती तसेच आजाराचे वेळीच निदान यामध्ये ‘प्रिव्हेंटिव्ह अन्कॉलॉजी’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या क्षेत्रात डॉ. गायकवाड यांची झालेली पदोन्नती ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.डॉ. अरविंद गायकवाड यांच्या या पदोन्नतीबद्दल वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार