केजला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास कॅबिनेटची मंजूरी ; ना. पंकजा मुंडे यांनी मानले मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांचे आभार




मुंबई दि. ०४ ---

केज जि. बीड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यास राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली, या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

  केज (जि. बीड) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे अशी येथील जनतेची खूप दिवसांपासूनची मागणी होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली, त्यामुळे केजला लवकरच न्यायालय सुरू होईल.  या न्यायालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांची पदे व त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस देखील विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे, या निर्णयाबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार