परळीत मराठी कामगार सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य-परीक्षा पॅड वाटप!


परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

     मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (घड्याळ) प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय महेशदादा जाधव साहेब यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या मराठी कामगार सेनेच्या वतीने येथील अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात (नेहरू चौक, तळ) शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा पॅड (Exam Pad) वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. अभ्यासाला प्रोत्साहन आणि शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याच्या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला मराठी कामगार सेनेचे परळी वैजनाथ शहर सचिव लक्ष्मीकांत बापू फुलारी आणि शहर उपसचिव राम भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शाळेतील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून रोज व्यायाम व शिस्त पाळावी, असा मोलाचा सल्ला या वेळी देण्यात आला. हातात परीक्षा पॅड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महेशदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!