मोनू ब्लॅक पँथरची 'धावती नवसयात्रा' उद्या परळीत; परळीकर करणार जोरदार स्वागत

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   बिहारमधील पटना येथील १९ वर्षीय धावपटू मोनू सिंग (मोनू बेतुरावाला / मोनू ब्लॅक पँथर) हा आपल्या आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी १२ ज्योतिर्लिंग आणि ४ धाम यांची धावती (रनिंग) यात्रा करत आहे.मोनू ब्लॅक पँथरची 'धावती नवसयात्रा' उद्या शुक्रवारी (दि.९) सकाळी परळीत येत असुन मोनुसिंगचे परळीकर  जोरदार स्वागत करणार आहेत.याबाबत परळीकरांकडून स्वागताला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   मोनूची आई लालती देवी यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यावेळी मोनूने 'आई बरी झाल्यावर मी धावत १२ ज्योतिर्लिंग आणि ४ धाम यात्रा करेन' असा नवस (संकल्प) केला होता. आई पूर्णपणे बरी झाल्यानंतर त्याने १५ मार्च २०२६ रोजी पटना येथून या यात्रेची सुरुवात केली.मोनू दररोज सुमारे ५० किलोमीटर धावून हा खडतर आध्यात्मिक प्रवास पूर्ण करत आहे. सध्या मोनू महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी पोहोचला असून नाशिक (त्र्यंबकेश्वर), कोपरगाव आणि वैजापूर मार्गे तो बीड जिल्ह्यात दाखल झाला आहे. बीडहून तो  ज्योतिर्लिंग परळी वैजनाथकडे धावत येणार आहे. ठिकठिकाणी मोनुसिंगचे स्वागत होत आहे. या अनुषंगानेच उद्या शुक्रवारी (दि.९) सकाळी ९ वा. परळीत येत असुन संत जगमित्रनागा मंदिर येथे मोनुसिंग यांचा स्वागत सोहळा होणार आहे.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन 'आम्ही परळीकर' म्हणून करण्यात आले आहे.


#मोनूब्लॅकपँथर #धावतीनवसयात्रा #परळीवैजनाथ #श्रीवैद्यनाथ #ज्योतिर्लिंग #१२ज्योतिर्लिंग #चारधाम #नवसयात्रा #परळीकर #मोनूसिंग #धावपटू #आध्यात्मिकयात्रा #आईसाठीनवस #वैद्यनाथनगरी #ParliVaijnath #MonuBlackPanther #RunningYatra #Jyotirlinga #CharDham #MaharashtraNews #ParliNews

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!