मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.....

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी २६ ऑक्टोबरला बीडमध्ये धडक मोर्चा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : 

        बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी शासकीय कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, बंद पडलेल्या योजनांचा प्रश्न मार्गी लागावा आणि प्रलंबित आर्थिक मदत मिळावी, यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे प्रा.बी.जी. खाडे यांनी सांगितले.

            बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे. कामगारांना आर्थिक सहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी मदत तसेच इतर कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करावी, या उद्देशाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून दुपारी १२.३० वा.निघणार आहे. या आंदोलनात बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, सरचिटणीस  ओम पुरी, प्रकाश वाघमारे , पप्पू आजबे . जालिंदर गिरी, शेख जावेद, शरद फडतारे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!