सावरगाव येथे भगवान भक्तीगड दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा-भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे
सावरगाव येथे ऐतिहासिक दसरा मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थितीत रहावे-भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवानबाबा यांची जन्मभूमीत दसरा मेळावा विजयादशमी दि. २० ऑक्टोबररोजी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षकन्या राज्याच्या मंत्री ना.पंकजाताई मुंडे व बीड जिल्हाच्या दबंग खा.डॉ .प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संत भगवान बाबांच्या पावन जन्मभूमी सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यास परळी तालुक्यातील नागरिकांनी ऐतिहासिक दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची दरवर्षीच उत्सुकता असते. लाखोंची गर्दी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असते. भगवान भक्तीगडावर होणारा दसरा मेळावा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून या दसरा मेळाव्याची ओळख आहे. येत्या मंगळवारी २० ऑक्टोबरला हा मेळावा आहे.या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक लाखोंच्या संख्येने भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात. यावर्षीही भक्ती आणि शक्तीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरगाव (ता. पाटोदा ) येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.लाखो नागरिक उपस्थित राहणार आहेत. संघर्षाच्या वाटचालीमध्ये सीमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. तरी राष्ट्रीय संत भगवान बाबा जन्मगावी होत असलेल्या दसरा मेळाव्यास महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून राज्यातुन भगवान बाबांचे भक्तगण, राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार भाविकांची मोठी संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सावरगाव घाट येथे . " बैसोनी पाण्यावरी, वाचली ज्ञानेश्वरी " अशी ज्यांची ख्याती असलेली राष्ट्रसंत भगवान बाबाची भव्य मूर्ती आणि तळघरात भगवान बाबांची मूर्ती अशा स्वरूपाची भव्य वास्तू येथे असुन या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय दरवर्षी उपस्थित असतो. आपला दसरा आणि आपल्या परंपरेसाठी मी भगवान भक्तीगडावर येत आहे तुम्ही पण या, सुखरूप या आणि सुखरूप परत घरी पुरणपोळी खाण्यासाठी पोहचा असा भावनिक संदेश ना.पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे.आपला दसरा, आपली परंपरा ; भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला महाराष्ट्रतील जिल्ह्यासह राज्यातील व बाहेरील राज्यातील व तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील सर्व सन्माननीय आजी /माजी सर्व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सरपंच, चेअरमन , सर्व सदस्य व कार्यकर्ते, समाज बांधवांनी व बहुजन समाजातील बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्तीत राहावे,असे आवाहन भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा