ना. पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; राज्यभरातून उसळणार जनसागर...

भगवान भक्तीगडावर उद्या होणार भक्ती अन् शक्तीचा अनोखा संगम!

यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार सीसीटीव्हीच्या निगराणीत


वीस एकरवर सभा • ११० एकरवर वाहनाची पार्किंग • तीन हेलिपॅड • ट्रस्ट मार्फत पिण्याचे पाणी

बीड दि. १९ ----

राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडावर उद्या मंगळवारी (ता. २०) दसरा मेळावा पार पडणार आहे. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मानल्या जाणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, राज्याच्या विविध भागांतून भगवान बाबांचे अनुयायी आणि मुंडे  समर्थक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मेळाव्यात ना .पंकजाताई मुंडे काय संकल्प देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

      भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला धार्मिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचाराचा वारसा, वंचित आणि शोषित घटकांच्या सेवाभावनांशी जोडलेल्या या मेळाव्यातून दरवर्षी पंकजाताई मुंडे अठरा पगड जाती धर्मातील जनतेशी संवाद साधतात. भगवान बाबांच्या विचारांना अभिवादन करण्याबरोबरच या मेळाव्यातून जनतेला कोणता संदेश दिला जातो, याचीही उत्सुकता असते. त्यामुळे मेळाव्यातील त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० एकरांवर सभा; ११० एकरांवर पार्किंग

------------------

    दसरा मेळाव्यासाठी सुमारे २० एकर क्षेत्रावर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी ११० एकर जागेची व्यवस्था करण्यात आली असून, २० बाय ४० आकाराचे व्यासपीठ आणि तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. ना. पंकजाताई मुंडे दुपारी ११.३० वा. हेलिकॉप्टरने भगवान भक्ती गडावर दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते स्मारकातील गर्भगृहात असलेल्या भगवान बाबांच्या मूर्तीची पूजा होईल, त्यानंतर पंकजाताई मुंडे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.

संपूर्ण मेळावा यंदा प्रथमच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

-------------------

गेल्या बारा वर्षापासून भगवान भक्ती गडावर भव्य दिव्य लाखोंचा दसरा मेळावा संपन्न होतो. हे दसरा मेळाव्याचे सावरगाव घाट येथील तेरावे वर्ष आहे. यंदा प्रथमच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे भगवान भक्तीगड स्मारक मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून या ठिकाणी वृक्षारोपण झाल्याने चहुबाजूने सावली झाली आहे.

संत भगवानबाबा ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी सुविधा

------------------

सावरगाव घाट येथील संत भगवानबाबा स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि आदल्या दिवसापासून दाखल होणाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!