ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित भगवान भक्तिगड सावरघाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहा -राजेश गित्ते
परळी वैजनाथ (प्रतिनिधी )---
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची दरवर्षीच उत्सुकता असते. लाखोंची गर्दी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असते. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या दसरा मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी वैजनाथ भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांनी केले.
भगवान भक्तीगडावर होणारा दसरा मेळावा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून या दसरा मेळाव्याची ओळख आहे.राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक लाखोंच्या संख्येने भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात.संत भगवान बाबाची जन्मभूमी असल्याने सावरगाव घाट येथे होणाऱ्या या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.
सावरगाव घाट येथे पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचत असलेली राष्ट्रसंत भगवान बाबाची भव्य मूर्ती आणि तळघरात भगवान बाबांची मूर्ती अशा स्वरूपाची भव्य वास्तू येथे असुन या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय दरवर्षी उपस्थित असतो. या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश गित्ते यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा