मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन....

परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रविवारी विजयादशमी उत्सव : सघोष पथसंचलन व मान्यवरांचे मार्गदर्शन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे दरवर्षीप्रमाणे श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात शहरात सघोष पथसंचलन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. हिंदू समाजातील सामूहिक शक्ती आणि शौर्य जागृत करण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक व नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वा. औद्योगिक वसाहत वैद्यनाथ क्रीडा संकुल, शिवम सुपर शॉपी मार्गावरील बाजूस  येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक उमाकांत अंकुशराव इंगळे प्रमुख अतिथी म्हणून  तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जालना विभाग प्रचारक भरत देशपांडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.संघाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याचा आणि शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या उत्सवात स्वयंसेवकांनी, नागरिकांनी  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, परळी वैजनाथ तालुका संघसंचालक रतन कोठारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!