औष्णिक विद्युत केंद्र कार्यान्वित झाल्यापासून पहिल्यांदाच कामगिरी...

 ऐतिहासिक कामगिरी: परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्रमांक ८ ची सलग १०० दिवस अखंड वीजनिर्मिती

औष्णिक विद्युत केंद्र कार्यान्वित झाल्यापासून पहिल्यांदाच कामगिरी

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ८ (युनिट ८) ने सलग १०० दिवस अखंड वीजनिर्मिती करून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.औष्णिक विद्युत केंद्र कार्यान्वित झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारची विक्रमी कामगिरी नोंद झाली असुन मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दृष्टीने सलग १०० दिवसांचे अखंड संचलन हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या कामगिरीमुळे केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी या संचाने सलग १०० दिवसांचे अखंड संचलन पूर्ण केले. वीजनिर्मिती क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी केंद्रातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद करून मुख्य अभियंत्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. दिवस-रात्र मेहनत घेऊन संचाचे सुरळीत आणि अखंड संचलन सुनिश्चित करणाऱ्या अभियंत्यांचे, कर्मचाऱ्यांचे आणि कंत्राटी कामगारांचे मुख्य अभियंत्यांनी विशेष कौतुक केले. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, परस्पर सहकार्य, कामाप्रती निष्ठा आणि सातत्यपूर्ण देखभाल यांमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!