परळी शहर पोलीसांचीही २६ हजार २२४ रुपयांच्या गुटख्यावर कारवाई...

परळीत पोलिसांची कारवाई; १ लाख ३३ हजाराचा  गुटखा पकडला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ : प्रतिनिधी...

    शहरातील बरकत नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३३ हजार ११६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला. याप्रकरणी मोईन मिरासाहब कुरेशी (वय ३२, रा. आझाद नगर, ह.मु.बरकत नगर, परळी वैजनाथ) याच्याविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास बरकत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीने त्याच्या राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला.जप्त केलेल्या मुद्देमालात डायरेक्टर स्पेशल पान मसाला, विमल पान मसाला, प्रीमियम शॉट, राजनिवास पान मसाला तसेच इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३३ हजार ११६ रुपये आहे.ही कारवाई संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोंड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

परळी शहर पोलीसांचीही २६ हजार २२४ रुपयांच्या गुटख्यावर  कारवाई

---------------------  

      परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान नगर भागात मंगळवारी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सुमारे २६ हजार २२४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असुन एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी परमेश्वर अंगद फड (वय ३८ वर्षे, रा. हनुमान नगर, परळी) याच्या ताब्यातून तब्बल २६ हजार २२४ रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठा जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस हवालदार चरणसिंग पारशी वळवी (ब.नं. ११३७) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!