दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली...

 शिवराज बर्दापुरे यांचे निधन; योगीराज बर्दापुरे यांना बंधुशोक



परळी / प्रतिनिधी

परळी येथील प्रणव लॅबचे संचालक योगीराज बर्दापुरे यांचे ज्येष्ठ बंधू शिवराज गंगाधरआप्पा बर्दापुरे (वय ६७) यांचे मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) अल्पशा आजाराने निधन झाले. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवराज बर्दापुरे हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. तसेच वीरशैव लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते. त्यांच्या निधनाने बर्दापुरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्यावर बुधवारी(दि.१४) सकाळी ९.३० वाजता परळी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी, दोन मुले, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

शिवराज बर्दापुरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  बर्दापुरे कुटूंबीयांच्या दुःखात दै.मराठवाडा साथी परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!