राख विक्रीच्या वादावर तोडगा काढण्याचे मुख्य अभियंत्याचे आश्वासन; महिलांचे आंदोलन तूर्त स्थगित

परळी वैजनाथ, प्रतिनिधी : 

       परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राख वितरणातील जातीय भेदभावावरून दाऊतपुर येथील काही महिलांनी काल(दि.२७) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिवसभर मुख्या अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. रात्री उशिरा या आंदोलनावर तोडगा निघाला आहे. .परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीच्या आदेशांच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादात प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर महिलांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. राख उचलण्याच्या प्रक्रियेसंदर्भात संबंधितांना सूचना देत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

         महाजनकोच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रामार्फत राख विक्रीसाठी मंजूर आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणी राख विक्रीचे सेल ऑर्डर क्रमांक ०५२११ व ०५२१२ जारी होऊनही प्रत्यक्ष राख उचलण्याची प्रक्रिया सुरू नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार महिलांनी केली होती. तसेच, या प्रकरणात जातीय भेदभावातून अडवणूक होत असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली होती.राख विक्रीच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणे आणि संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळणे, हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे. प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

मुख्य अभियंत्यांचे लेखी पत्र

   या प्रकरणी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी पत्र दिले आहे. हे संबंधितांनाही देण्यात आले असुन मंजूर राख विक्रीच्या आदेशांनुसार राख उचलण्याच्या प्रक्रियेबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.राख विक्री व उचलण्याच्या प्रक्रियेसंदर्भात आवश्यक कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत असल्याचे अश्वासन देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!