रांजणगावात कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११२ जणांची तपासणी

रांजणगाव (संजय क्षिरसागर ) - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा रांजणगाव (शे.पुं.) यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्करोग जनजागृती व पूर्वतपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ११२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.*

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदानाचे महत्त्व आणि कर्करोगापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

शिबिराला डॉ. खाडीलकर, भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखाध्यक्ष रमेश गायकवाड, रवि अवसरमोल, नागेश खंदारे, अविनाश सोनवने, पांडुरंग सातदिवे, वंदना दवणे, देवता बर्डे, निर्मला खंदारे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शिबिराच्या यस्वितेसाठी समाजसेवा अधीक्षक बालाजी देशमुख, वैद्यकीय शिबिर समन्वयक इंदल जाधव, दीपक भोजने, डॉ. शेषराव कांबळे आणि डॉ. आसिफ शेख यांनी पुढाकार घेतला. तसेच डॉ. स्नेहा घोष, डॉ. दीपांजली, डॉ. दीपक बिरादार, ललिता सानप, लिडिया बेल्लारी, शैलेन्द्र शेळके, रविकांत अप्पार आणि यशवंत नंद यांनी आरोग्यसेवा प्रदान केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!