पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या कुटुंबाला एसबीआय चा एक कोटींचा आधार

अपघाती मृत्यूनंतर दिवंगत सौदागर सावंत यांच्या वारसांना विमा मदत; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

परळी, प्रतिनिधी : कर्तव्यावर असताना नव्हे, तर अपघाती मृत्यूने अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या पोलीस अंमलदाराच्या कुटुंबाला भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) सॅलरी पॅकेजअंतर्गत एक कोटी रुपयांची विमा मदत मिळाली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दिवंगत सौदागर माणिकराव सावंत यांच्या वारस सुनंदा सावंत यांना १४ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

सौदागर सावंत यांचा १६ जानेवारी २०२६ रोजी बीड शहरातील स्वराज्यनगर परिसरात सरस्वती शाळेजवळ स्कूटीचा ब्रेकरवर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार हरपल्याने निर्माण झालेल्या आर्थिक संकटात बँकेच्या विमा संरक्षणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सॅलरी पॅकेजमुळे विमा संरक्षणाचा लाभ

पोलीस कर्मचाऱ्यांच्या सॅलरी पॅकेज खात्याशी संलग्न विमा संरक्षणातून ही रक्कम मंजूर झाली. विमा मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी SBI चे क्षेत्रीय प्रबंधक अमित धुळे, मुख्य प्रबंधक योगेश रेंडाळकर, सहयोगनगर शाखेचे शाखा प्रबंधक श्रीकांत अंजनकर आणि सॅलरी पॅकेज विभागाचे अधिकारी प्रवीण तिडके यांनी प्रयत्न केले.

धनादेश वितरणाच्या प्रक्रियेत पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कल्याण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापूरे, मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई आणि कर्मचारी जयश्री शिंदे यांनीही योगदान दिले.

सावंत यांच्या निधनाने कुटुंबाची झालेली हानी भरून निघणे शक्य नसले, तरी एक कोटी रुपयांची विमा मदत भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कठीण प्रसंगी विमा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!