वाचन प्रेरणा दिनानिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथ परीक्षण वाचन स्पर्धा उत्साहात

परळी वैजनाथ :येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ परीक्षण वाचन स्पर्धेचे आयोजन लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहात करण्यात आले. या स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागप्रमुख डॉ. व्ही. जे. चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड होते. स्पर्धेचे आयोजन ग्रंथपाल डॉ. एस. ए. धांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. सातपुते  यांनी केले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांच्या सारांशाचे प्रभावी वाचन करून पुस्तकांमधील विचार, आशय आणि जीवनमूल्ये सादर केली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. ए. आर. चव्हाण आणि डॉ. एन. एम. आचार्य यांनी केले.

स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राची दत्तू मोगले हिने मन्नू भंडारी यांच्या *‘आपका बंटी’* या कादंबरीच्या सारांश वाचनासाठी पटकावले. द्वितीय पारितोषिक यशश्री दिलीप मुंडलिक हिला शिवाजी सावंत यांच्या *‘छावा’* या ग्रंथाच्या सारांश वाचनासाठी मिळाले. तृतीय पारितोषिक आयुरा अनिलकुमार बुरांडे  याला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या *‘अग्निपंख’* या पुस्तकाच्या परिचय व सारांश वाचनासाठी प्रदान करण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक इयत्ता अकरावी कला शाखेतील सत्यम बालाजी होळकर याला *‘Rich Dad Poor Dad’* या पुस्तकाच्या सारांश वाचनासाठी देण्यात आले.दुसरे उत्तेजनार्थ पारितोषिक पूनम मारुती कोदवाडकर यांना जिंकले विजेत्या विद्यार्थ्यांना ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

प्रमुख पाहुणे डॉ. व्ही. जे. चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड यांनी **“वाचाल तर वाचाल”** हा संदेश देत वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, पुस्तकांशी मैत्री वाढविणे आणि वाचनातून विचार मांडण्याची क्षमता विकसित करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. एम. जी. लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!