कर्करोग जनजागृतीपर व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर (संजय क्षिरसागर) -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय आणि डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन्स, जुबली पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी कर्करोग जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल आणि डॉ. ऋषिकेश खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड व डॉ. विनू अग्रवाल यांनी कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विद्या प्रधान, उपप्राचार्य नाझेमा खान, डॉ. मेघा राय आणि प्रा. तन्मय पैठणकर यांची उपस्थिती होती. या व्याख्यानाला एकूण १२० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. शेषराव कांबळे आणि डॉ. आसिफ शेख यांनी पुढाकार घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!