मराठवाड्याच्या समग्र प्रश्नांवर तळमळीने काम करणाऱ्या आ. सतीश चव्हाण यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा - नगराध्यक्ष सौ. पद्मश्री धर्माधिकारी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       विधीमंडळात मराठवाड्याचे समग्र प्रश्न , येथील सर्वसामान्यांचे व पदवीधरांचे मुद्दे जोरदारपणे मांडणे आणि न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे अशी आ .सतीश चव्हाण यांची कार्यपद्धती राहीली आहे. तसेच सगळ्यांचा आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठवाड्याचा विद्यार्थी इथे शिकला पाहिजे, इथं घडला पाहिजे आणि इथेच त्याचा हाताला काम मिळाले पाहिजे, एवढ्या मोठ्या संस्था, उद्योग या भागात आले पाहिजेत यासाठी सातत्याने तळमळीने काम करणाऱ्या सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

    आ .सतीश चव्हाण यांनी गेल्या अठरा वर्षात विधान परिषदेच्या सभागृहात पदवीधर, विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, महिला, युवक, शेतकरी-कष्टकरी अशा समाजातील सर्वच घटकांसाठी काम केले आणि त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला.अनेक प्रश्न सभागृहात मांडले आणि ते सोडवूनही घेतले आहेत. मराठवाड्याच्या समग्र प्रश्नांची जाण असलेला अनुभवी आणि सर्व पातळ्यांवर तळमळीने काम करणारा लोकप्रतिनिधी पदवीधरांचा लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आ.सतीश चव्हाण यांच्या विजयाचा चौकार त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन मारावा लागेल. आ. सतीश चव्हाण यांना या निवडणुकीत प्रथम पसंतीचे मत देऊन विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ .पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!