पुतण्याने डोक्यात कुऱ्हाडीने वार करून केले गंभीर जखमी

जागरण गोंधळाच्या वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कार्यक्रम करण्यास विरोध केल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत; पुतण्याने डोक्यात कुऱ्हाडीने वार करून केले गंभीर जखमी

शिरूर कासार : जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यावरून झालेल्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी शिवारात घडली. या हल्ल्यात सतीश भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जागरण गोंधळाचा कार्यक्रम का करता, असा जाब विचारत सतीश भोसले यांची भावजय शालन भोसले, पुतण्या सुरज भोसले, पुतण्याची पत्नी काशी भोसले आणि पुतणी चांदणी भोसले (सर्व रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी त्यांच्याशी वाद घातला.

वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यावेळी पुतण्या सुरज भोसले याने सतीश यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी सतीश भोसले यांच्या फिर्यादीवरून २९ ऑक्टोबर रोजी शिरूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेश गाडवे पुढील तपास करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..