वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; घटमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आयलोजी घटमल यांना बंधू शोक;आकाश वैजनाथ घटमल यांचे निधन
वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; घटमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी येथील उद्योजक आयलोजी घटमल यांचे बंधू आकाश वैजनाथ घटमल यांचे दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे ३७ वर्षे होते. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने घटमल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आकाश घटमल यांच्या अकाली जाण्याने घटमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील तरुण सदस्याच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे.
*आज अंत्यसंस्कार*
आकाश वैजनाथ घटमल यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता परळी येथील नंदागोळ रोडवरील भोई समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आकाश घटमल यांच्या निधनाने घटमल कुटुंबीयांवर ओढवलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा