अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा..

पाणीटंचाईच्या नियोजनासह परळीच्या विविध विकास कामांना न. प.च्या सर्वसाधारण सभेत दिशा !

सभागृहात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास आणि पथविक्रेता आराखड्याबाबत निर्णय; नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

    ना. पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश घेऊन नगरपरिषद काम करत आहे. आगामी काळात उद्भवू शकणारी पाणीटंचाई, शहरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरी प्रश्नांच्या निराकरणावर लक्ष केंद्रित करीत परळी वैजनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेत पाणीटंचाई निवारण आराखडा, रस्ते विकास, घनकचरा व्यवस्थापन, पथविक्रेत्यांचे नियोजन आणि निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

    ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  दुष्काळी परिस्थितीचा विचार करून संभाव्य  पाणीटंचाई व अन्य बाबींसाठी स्वतंत्र टंचाई आराखडा तयार करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सुधारित निकषांनुसार जिल्हा नियोजन समितीकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा झाली. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाबरोबरच शहरातील विकासकामे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरातील प्रस्तावित रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या जागांची मोजणी करून संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) देण्याची कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले. तहसील कार्यालयामागील सर्व्हे क्रमांक २० आणि २१ मधील प्रस्तावित ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचाही निर्णय झाला.


*कचऱ्यापासून इंधननिर्मितीचा प्रस्ताव*

-------------------

      घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने २५ टन प्रतिदिन क्षमतेचा आधुनिक व्हॅक्यूम डिहायड्रेटेड प्रोसेस सिस्टीम प्रकल्प उभारण्याबाबत सभेत निर्णय घेण्यात आला. शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून इंधन म्हणून वापरता येणाऱ्या पॅलेट्सची निर्मिती करण्याची या प्रकल्पामागील संकल्पना आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास कचरा व्यवस्थापनासोबतच त्याचा पुनर्वापर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.


*पथविक्रेता आराखड्याबाबत निर्णय*

-------------------

       मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत 'पालिका तेथे मत्स्यबाजार' ही संकल्पना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली. स्थानिक मत्स्यव्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा त्यामागील उद्देश आहे. शहरातील पथविक्रेत्यांच्या व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या आराखड्याला मान्यता देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.


*निवासी अतिक्रमणांच्या नियमनासाठी चर्चा*

-------------------

      १ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे शासनाच्या प्रचलित नियमांनुसार नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेसाठी विधिज्ञ सल्लागार नियुक्त करण्याचे ठरले. नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला आडत व्यावसायिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवश्यक परवाने घेण्याबाबतही चर्चा झाली. तसेच अग्निशमन विभागाच्या जुन्या वाहनावर १२ हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर बसविणे, नगर परिषदेच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग शेड उभारणे आणि पाणीटंचाई व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अडचणी येणाऱ्या विकासकामांना आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्याचे प्रस्तावही सभेत संमत करण्यात आले.


*गौरव: नगराध्यक्षांच्या निवडीबद्दल अभिनंदन ठराव* 

-------------------

     दरम्यान, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) यांच्या  गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सभागृहाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


*अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात  सर्वसाधारण सभा*

-----------------

      विषय सूचीप्रमाणे साधक बाधक चर्चा व शहर विकासाच्या दृष्टीने केंद्रित मुद्द्यांवर चर्चा करत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सर्वसाधारण सभा पार पडली. या 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..