पाणीपुरवठा सभापती जयश्री ताई व रविंद्र (पापा) गीते यांचा पुढाकार....

 दुष्काळात सामाजिक बांधिलकीचा दीप; साई प्रेम फाऊंडेशनकडून ४०० गरजूंना दिवाळी फराळ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : 

     दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या वाट्याला यावा, या भावनेतून साई प्रेम फाऊंडेशनच्या वतीने सुमारे ४०० निराधार, गोरगरीब आणि वंचित नागरिकांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. 

साई प्रेम फाऊंडेशनचे साईभक्त तथा उद्योजक रवींद्र (पापा) गित्ते आणि परळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्रीताई गित्ते यांच्या पुढाकारातून दीपावली तथा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला. घाटनांदूर येथील गुरुदास सेवा आश्रम, परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसर, रेल्वे स्थानक आणि वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील गरजू नागरिकांपर्यंत फाऊंडेशनचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी फराळ किटचे वाटप करण्याबरोबरच लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंदही साजरा केला.

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसमोर अनेक प्रश्न उभे असताना सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. अशा काळात केवळ मदतीचा हात देणे नव्हे, तर गरजू व्यक्तींना आपुलकीची जाणीव करून देणेही महत्त्वाचे ठरते. फराळ किटच्या माध्यमातून साई प्रेम फाऊंडेशनने ही सामाजिक बांधिलकी जपली.

या उपक्रमावेळी भास्कर मामा चाटे, सुरेश टाक, टी. डी. मुंडे, मुंबई येथील अभियंता अमोल सोनवणे, भागवत मुंडे, जगु पवार, महेश मंत्री, राज (प्रेम) रवींद्र गित्ते, रुजूता (सई) रवींद्र गित्ते, पिटू दुदले, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.निराधारांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेला सणाचा आनंद हेच या उपक्रमाचे खरे फलित ठरले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..