मागील हंगामातील प्रतिटन ३,०५० रुपये दराची पूर्तता...

 जाहीर केलेल्या दराची पूर्तता :ओंकार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिलासा

प्रतिटन १०० रुपयांचा उर्वरित हप्ता खात्यात जमा ; चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांची माहिती

परळी, दि. ११ : मागील गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या दरानुसार प्रतिटन १०० रुपयांचा उर्वरित हप्ता ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ०८, पागरी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी मागील गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसदर जाहीर करून दराची कोंडी फोडली होती. सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठविलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३,०५० रुपये दर देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी प्रतिटन २,९५० रुपयांची रक्कम यापूर्वीच शेतकऱ्यांना अदा करण्यात आली होती. आता उर्वरित प्रतिटन १०० रुपयांचा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती बोत्रे-पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी ओंकार ग्रुप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. चालू गळीत हंगाम २०२६-२७ मध्येही कारखान्याकडे येणाऱ्या उसाला वाजवी दर देण्यासह ऊसबिलांची रक्कम शक्य तितक्या लवकर अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस ओंकार साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील आणि जनरल मॅनेजर सुधाकर व्ही. सोळंके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..