परळी शहरासाठी बहुमानाची व गौरवास्पद बाब...

 मुंबईत ३ री जागतिक महापौर परिषद : परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी सहभागी

आंतरराष्ट्रीय परिषदेत परळीला मानाचे प्रतिनिधित्व; देश- विदेशातील नागरी नेतृत्वाची उपस्थिती

परळी वैजनाथ, प्रतिनिधी:

    ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील परळी वैजनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नियामक मंडळाच्या सदस्या सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या मुंबई येथे आजपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत (वर्ल्ड मेयर्स फोरम -२०२६)  सहभागी झाल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. जागतिक स्तरावरील या महत्त्वपूर्ण मंचावर सहभागी होण्याचा मान मिळवणाऱ्या त्या परळीच्या पहिल्या नगराध्यक्षा ठरल्या आहेत.

      ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने २५ व २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारतासह विविध देशांतील महापौर, नगराध्यक्ष, नगरप्रमुख तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री तोखन साहू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर रितू तावडे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे अध्यक्ष रणजीत चव्हाण आणि व्यवस्थापकीय संचालक तथा माजी सनदी अधिकारी जयराज फाटक, उपाध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, नियामक मंडळ सदस्या डॉ. अर्चना अडसड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आहे.

३२ देशांतील महापौरांची उपस्थिती, आधुनिक नागरी प्रशासनाच्या आव्हानांवर होणार मंथन

------------------

     या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दोन दिवसांच्या कालावधीत विविध विषयांवरील परिसंवाद, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. जागतिक स्तरावर नागरी प्रशासन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, संशोधक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध राज्यांतील मंत्री या परिषदेत सहभागी आहेत. जागतिक पातळीवरील तज्ञ हे स्थानिक स्वराज्य संस्थाना एआय चा उपयोग, जिओ इन्फॉर्मशनचा वापर,घनकचरा व्यवसस्थापन,देश व राज्य पातळी वरील योजना करताना स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मत घेणे,नागरिकरणातील आव्हाने आणि समस्या, शहराचे अंडरग्राउंड व्यवस्थापन,यासह अनेक विषय आणि चर्चासत्र या परिषदेत आहेत. या परिषदेत एकूण 32 देशातील निमंत्रित महापौर व प्रतिनिधींचा सहभाग आहे.

परळी शहरासाठी बहुमानाची व गौरवास्पद बाब

------------------

   ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा म्हणून काम करतांना काही दिवसांपूर्वीच सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नियामक मंडळावर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत या माध्यमातून परळी शहराचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. जागतिक महापौर परिषदेत नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या सहभागामुळे परळी वैजनाथ शहराच्या दृष्टीने ही बहुमानाची व गौरवास्पद बाब ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..