जबदे कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण संवाद...

खासदार बंडू जाधव यांची मनोज जबदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

छत्रपती संभाजीनगर : परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बंडू जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर येथील श्री. मनोज जबदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जबदे कुटुंबीयांनी त्यांचे आपुलकीने स्वागत करून सन्मानपूर्वक सत्कार केला.

या भेटीदरम्यान खासदार बंडू जाधव यांनी जबदे कुटुंबीयांशी मनमोकळा आणि आत्मीय संवाद साधला. कौटुंबिक जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकीने भारलेल्या या भेटीत त्यांनी कुटुंबीयांसमवेत स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला.

राजकीय व सार्वजनिक जीवनातील व्यस्ततेतून वेळ काढत जपलेली ही स्नेहभेट परस्परांतील जिव्हाळ्याचे आणि आपुलकीच्या संबंधांचे दर्शन घडवणारी ठरली. या भेटीमुळे जबदे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..