रस्ते बंद करून भाविकांची अडवणूक कशासाठी? -अभयकुमार ठक्करांचा संताप

कार्तिकी पौर्णिमेला भाविकांची गैरसोय; कालरात्री देवीच्या दर्शनासाठी खड्डयातून मार्गक्रमण

रस्ते बंद करून भाविकांची अडवणूक कशासाठी? -अभयकुमार ठक्करांचा संताप

परळी वैजनाथ : हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त परळी शहराचे ग्रामदैवत श्री कालरात्री देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असताना नगर परिषदेने याच दिवशी मंदिराकडे जाणाऱ्या धनमना देवी ते काळरात्री मंदिर मार्गावर खड्डा खोडल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. नगर परिषदेच्या या नियोजनशून्य कारभाराचा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

श्री कालरात्री देवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, भाविकांची गर्दी आणि धार्मिक महत्त्व लक्षात न घेता धनमनादेवी मंदिर ते काळरात्री मंदिर मार्गावर मोठा खड्डा खोदून ठेवला असल्याने भाविकांना दर्शनासाठी जावे लागत आहे. याशिवाय अंबेवेस येथील पुलावरही कामे सुरू असल्याने श्री वैद्यनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

धार्मिक सण आणि भाविकांची गर्दी माहीत असतानाही नगर परिषदेला कामांचे नियोजन करता येत नाही का? असा सवाल उपस्थित करत अभयकुमार ठक्कर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

यापुढे दर्शनासाठी जाणारा मार्ग नगर परिषदेने अशाच प्रकारे बंद केला किंवा भाविकांची गैरसोय केली, तर शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशाराही अभयकुमार ठक्कर यांनी दिला आहे.

धार्मिक श्रद्धेच्या या महत्त्वपूर्ण दिवशी भाविकांना मूलभूत सुविधांऐवजी बंद रस्त्यांचा सामना करावा लागत असल्याने नगर परिषदेने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन भाविकांसाठी मार्ग मोकळा करावा, अन्यथा नगरपरिषदेस ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..