कर्मचाऱ्यांसमोर शेर आणि प्रत्यक्ष सभागृहात ढेर !

१६ नगरसेवक कर्मचाऱ्यांसमोर आक्रमक, मग सर्वसाधारण सभेत मौन का? - नगरसेवकांच्या भूमिकेवर सय्यद बहादूरभाई यांचा सवाल

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

        परळी नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या शिस्तीचा आणि प्रशासनातील कारभाराचा मुद्दा उपस्थित करत ‘नगर परिषदेत चालतंय तरी काय?’ या उपक्रमाच्या माध्यमातून रीलद्वारे भूमिका मांडणाऱ्या १६ नगरसेवकांनी आजच्या सर्वसाधारण सभेत मात्र याच विषयावर ठाम भूमिका का घेतली नाही, कर्मचाऱ्यांसमोर शेर आणि प्रत्यक्ष सभागृहात ढेर  का झाले? असा सवाल काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादूरभाई यांनी उपस्थित केला आहे.

     नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या शिस्तीचा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर आक्रमक भूमिका मांडणारे नगरसेवक प्रत्यक्ष सर्वसाधारण सभेत या विषयावर का बोलले नाहीत? कर्मचाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका आणि  प्रत्यक्ष निर्णय करायचा सभागृहात मात्र मौन, अशी भूमिका का दिसून आली?, असा प्रश्न बहादूरभाई यांनी उपस्थित केला. कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील शिस्त, नगरसेवकांची प्रलंबित कामे आणि प्रशासनाकडून मिळणारी माहिती या मुद्द्यांवर सभागृहात ठोस चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील आक्रमक भूमिकेचे प्रतिबिंब सभेतील चर्चेत दिसले का, याचे उत्तर संबंधित नगरसेवकांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. सोशल मीडियावर व्यक्त केलेली नाराजी आणि प्रत्यक्ष सभागृहातील भूमिका यामध्ये तफावत असल्याचा आरोप करत, नगरसेवकांनी केवळ रीलपुरती आक्रमकता न दाखवता शहराच्या प्रश्नांवर सभागृहातही ठामपणे आवाज उठवावा, अशी अपेक्षा सय्यद हनीफ उर्फ बहादूरभाई यांनी व्यक्त केली आहे.कर्मचाऱ्यांसमोर शेर आणि सभागृहात ढेर?” अशी अवस्था झाल्याचा बोचरा सवाल उपस्थित करत बहादूरभाईंनी या नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..