पोस्ट्स

MB NEWS:*⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕*

इमेज
 *⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕* मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे तब्बल १४,४९२ रुग्ण आढळले आहेत. याआधी २० ऑगस्टलाही एवढेच रुग्ण सापडले होते. आजच्या एका दिवसात कोरोनामुळे २९७ जणांचा मृत्यू झाला आहे.  महाराष्ट्रामधली कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६,७१,९४२ एवढी झाली आहे, यापैकी १,६९,५१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४,८०,११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या एका दिवसात ९,२४१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातला कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ७१.४५ टक्के एवढं आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे २१,९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत सर्वाधिक ७,३८८ जण दगावले आहेत. तर पुणे जिल्ह्यात ३,६७४ आणि ठाणे जिल्ह्यात ३,५३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळाले. पुणे शहरात २४ तासात १,५८१ रुग्णांची नोंद झाली, तर ४० जणांचा मृत्यू झाला. पुणे मनपा क्षेत्रात आ...

MB NEWS:बीड : आज 82 पॉझिटिव्ह तर 603 निगेटिव्ह*

इमेज
 *बीड : आज 82 पॉझिटिव्ह तर 603 निगेटिव्ह* *बीड 29, अंबाजोगाई 17, केज 1, माजलगाव 13, परळी 2 , शिरूर 5, वडवणी 1 , गेवराई 6, आष्टी 3 ,  धारूर तालुक्यात 5 रुग्ण आढळले*

MB NEWS:हर्षोल्हासाने श्रीगणेशाची स्थापना: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचीप येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट !

इमेज
  हर्षोल्हासाने श्रीगणेशाची स्थापना: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचीप येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट ! परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...   बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करताना दिसतात. बीडच्या पोलीस दलात कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडत ते नेहमीच आपल्या पदाचा अभिनिवेश बाजूला ठेवून वावरताना दिसतात.   आज दि.   22 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक श्री.हर्ष ए पोद्दार यांनी परळी येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट दिली.पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कुटुंबातील श्रीगणेशच्या स्थापनेत सामील होऊन त्यांच्या आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.यातून ह्या कोरोना योद्ध्यांना सन्मानित केले.

MB NEWS:बीड जिल्ह्यात आज ८२ पाॅझिटिव्ह; परळीत दोन

इमेज
  बीड जिल्ह्यात आज ८२ पाॅझिटिव्ह; परळीत दोन परळी वैजनाथ/प्रतिनिधी....    आज दि.२२ रोजी चे अहवाल प्राप्त झाले असुन यामध्ये परळीत आज दोन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये स्नेहनगर व पंचवटी नगर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

MB NEWS:*नाथ प्रतिष्ठानच्या प्रसिद्ध श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात; ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते श्रींची स्थापना* *कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे; साधेपणाने साजरा करा गणेशोत्सव - धनंजय मुंडे*

इमेज
  *नाथ प्रतिष्ठानच्या प्रसिद्ध श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात; ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते श्रींची स्थापना* *कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे; साधेपणाने साजरा करा गणेशोत्सव - धनंजय मुंडे* परळी (दि. २२) ---- : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केला जाणारा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास साधेपणाने सुरुवात करण्यात आली. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दुपारी ४ वा. विधीवत पूजा करत श्रीगणेशाची स्थापना करून आरती करण्यात आली.  यावेळी राज्यावरचे कोरोना रूपी संकट दूर करण्यासाठी गणरायाला साकडे घातले असल्याचे ना. मुंडे म्हणाले. तसेच जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व कोरोनाविषयक नियमांची खबरदारी घेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.  यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव सिरसाट, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसे...

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी 'श्री ' चे उत्साहात आगमन* *जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना

इमेज
  *पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी 'श्री ' चे उत्साहात आगमन* *जनतेवर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची केली प्रार्थना !* मुंबई दि. २२ -------  पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी आज  श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजाताई मुंडे व त्यांचे पती डाॅ. अमित पालवे यांनी 'श्रीं ' ची यथोचित पूजा करून करून आशीर्वाद घेतले. देशातील व महाराष्ट्रातील जनतेवर आलेले कोरोना महामारीचे विघ्न दूर कर अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.    प्रतिवर्षी परंपरे प्रमाणे यंदाही  पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी सकाळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे व त्यांचे चिरंजीव आर्यमान पालवे यांनी गणरायाची यथासांग पूजा केली. गणपतीची अतिशय देखणी व सुबक अशी मुर्ती आणि त्यासमोर मांडलेली विविध प्रकारच्या फुलांची आरास यामुळे वातावरण यावेळी अगदी भक्तीमय झाले होते.    सध्या कोरोना महामारीचे संकट देशावर आणि राज्यांवर आहे, या संकटात गणपती बाप्पांनी संकटमोचक बनून हे विघ्न दूर करावे अशी प्रार्थना करत पंकजाताई मुंडे यांनी कोरोन...

MB NEWS:नवीन आदेश आले : २३ पासुन लाॅकडाऊन शिथिल

इमेज
 नवीन आदेश आले : २३ पासुन लाॅकडाऊन शिथिल