पोस्ट्स

MB NEWS-जिरेवाडी या गावाला सतत चौथ्यांदा एलआयसी तर्फे विमा ग्राम पुरस्कार* *_जिरेवाडी गावचा आदर्श घेत इतर ग्रामपंचायतीने विमा ग्राम पुरस्कार मिळवावा - शाखाधिकारी सुधीर कांत_*

इमेज
 * जिरेवाडी या गावाला सतत चौथ्यांदा एलआयसी तर्फे विमा ग्राम पुरस्कार* *_जिरेवाडी गावचा आदर्श घेत इतर ग्रामपंचायतीने विमा ग्राम पुरस्कार मिळवावा - शाखाधिकारी सुधीर कांत_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील जिरेवाडी या गावाला एलायसीचा बिमाग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले.जिरेवाडी परिसरात असलेल्या अयोध्या नगर मध्ये असलेल्या श्री राम मंदिर येथे बीमाग्राम पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय जीवन बीमा निगम शाखा अंबाजोगाई यांच्या कडुन हा पुरस्कार जिरेवाडी गावाला वितरित करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कांत शाखाधिकारी परळी प्रमोद भालेराव विकास अधिकारी परळी, बालासाहेब मुंडे मुख्य विमा सल्लागार तसेच विमा प्रतिनिधी दिगंबर मुंडे श्रीहरी गुट्टे या सर्वांच्या उपस्थिती मध्ये एक लाख रुपये चेक देण्यात आला. पुढील वर्षीही आम्ही हा पुरस्कार निश्चित मिळवू असा विश्वास सरपंच गोवर्धन मुंडे यांनी व्यक्त केला. जिरेवाडी या गावाचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतीने देखील विमा ग्राम पुरस्कार मिळवावा असे उद्गार सुधीर कांत यांनी काढले या कार्यक्रमाला उपसरपंच शिवाजी म...

MB NEWS- *ओबीसींना न्याय मिळेपर्यंत संघर्षाची मशाल तेवत ठेवू ; राज्य सरकारने तातडीने इम्पेरीकल डाटा तयार करावा* *आरक्षण हेच आपले कवचकुंडल,लढ्यात सर्वांसोबत सर्वात पुढे राहू* लातूरच्या ओबीसी मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन

इमेज
 *ओबीसींना न्याय मिळेपर्यंत संघर्षाची मशाल तेवत ठेवू ; राज्य सरकारने तातडीने इम्पेरीकल डाटा तयार करावा*  *आरक्षण हेच आपले कवचकुंडल,लढ्यात सर्वांसोबत सर्वात पुढे राहू* लातूरच्या ओबीसी मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन लातूर । दिनांक २४ । स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने ओबीसी समाजासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने योगदान द्यायचे आहे.जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल तेवत ठेवणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हंटले आहे.लातूर येथे आयोजित ओबीसी मेळाव्याला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना त्या बोलत होत्या. ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही,पक्षपात आणि राजकारण करायचे नाही.हा लढा राजकीय हेतूसाठी नसून वंचितांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी आहे.आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी एकजुटीने समर्पित भावनेने योगदान देऊन आरक्षणाचे संरक्षण करायचे असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. पाच जिल...

MB NEWS-ना.धनंजय मुंडेंच्या भाषणात एक वाक्य अन् पब्लिक बोललं 'वन्समोर'............!(VIDEO)

इमेज
  ना.धनंजय मुंडेंच्या भाषणात एक वाक्य अन् पब्लिक बोललं 'वन्समोर'............! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          ना.धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे 'फॅन्स' खुप मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांच्या भाषणातील त्यांची वाक्यफेक, एखादे विशिष्ट वाक्य, काव्यपंक्ती इतक्या लोकप्रिय होऊन जातात की त्यानंतर सोशल मिडिया असो की बॅनर्स जिथे तिथे तेच दिसायला लागते.तरुणाईला तर धनंजय मुंडे यांचे हे डायलाॅग प्रचंड भावतात.असाच अनुभव दि.२२ रोजी परळीत झालेल्या भाषणाचाही आला.आपल्या अमोघ वक्तृत्व शेलीतुन भाषणाचा ओघ सुरू होता यादरम्यान ना.धनंजय मुंडे यांनी एक हिंदी शेर आपल्या शैलीत सांगितला अन् समोरचं पब्लिक बोललं 'वन्समोर.        राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे  म्हणजे एक अजोड वक्ता. त्यांचे अमोघ वक्तृत्व नेहमीच ऐकायला मिळते.त्यांचे भाषण ऐकणे ही एक वेगळीच पर्वणी असते. त्यांची भाषणाची स्टाईल अनेकांना 'दिवाणा' बनवते.त्यांचे भाषण सुरू झाल्यापासुन श्रोते खिळून बसतात.लाखो समर्थकांना एकाचवेळी 'अपिल' होणारा संदेश व संकेत द...

MB NEWS-१००टक्के गुण मिळविलेल्या तन्वी बेंबळगेचा सत्कार

इमेज
  १००टक्के गुण मिळविलेल्या तन्वी बेंबळगेचा सत्कार परळी वै (प्रतीनिधी)  दहावीच्या बोर्डाचा 100% गूण घेणारी तन्वी मनोज बेंबळगे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना  साद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चांद भैय्या तांबोळी, मनोज बेंबळगे, अशोक लिखे  उपस्थित होते.

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज २ रुग्ण तर जिल्ह्यात १७६ पाॅझिटिव्ह

इमेज
  आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज  २ रुग्ण तर जिल्ह्यात १७६ पाॅझिटिव्ह परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०२ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या १७६ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या निरंक आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS- *संस्कार व मुल्यवर्धन उपक्रम:परळीत गीता परिवारच्या वतीने गुरुपौर्णिमा व आॅनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण !*

इमेज
 *संस्कार व मुल्यवर्धन उपक्रम: परळीत गीता परिवारच्या वतीने गुरुपौर्णिमा व आॅनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण !* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       संस्कार व मुल्यवर्धन करण्याच्यादृष्टीने गीता परिवारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात.लाॅकडाउनच्या काळात विविध आॅनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमा उत्सव व आॅनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.         परळी गीता परिवारच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव समारंभ घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व जयपाल लाहोटी उपस्थित होते.दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.चिमुकल्या मुलांनी स्वागतगीत व गुरुवंदना गायन करुन उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.चि.अथर्व पवन बंग याने तोटकाष्टकम् चे महत्व सांगितले. मराठवाडा विजेता ठरलेल्या स्वरश्री व तन्वी सुजीत डोंगरे यांनी तोटकाष्टकम् चे काव्यमय सादरीकरण केले.          गीता परिवारच्या वतीने .लाॅकडाउनच्या काळात व...

MB NEWS- *खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित घणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाला मुर्त रुप !* *_अजितदादांच्या वाढदिवसालाच भरलेल्या बंधार्यावर ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजनचा अपुर्व योग !_*

इमेज
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित घणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाला मुर्त रुप ! अजितदादांच्या वाढदिवसालाच भरलेल्या बंधार्यावर ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजनचा अपुर्व योग !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित"आठ दशके कृतज्ञतेची" अभियानात "स्वाभिमान महोत्सव" मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा घणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रम हाती घेण्यात आला होता. नगर परिषद च्या माध्यमातून साखळी बंधारा बांधण्यात आला.नगर परिषदेला पुरस्कार मिळाला. हा बंधारा आता तुडुंब भरून वाहत आहे.अजितदादांच्या वाढदिवसालाच भरलेल्या बंधार्यावर (दि.२२) रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजनचा अपुर्व योग आला.परळीकरांसाठी हा जलस्रोत उपयुक्त ठरणारा आहे.    भारताचे माजी कृषिमंत्री पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित"आठ दशके कृतज्ञतेची" अभियानात "स्वाभिमान महोत्सव" मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा या नदी मध्ये एकदिवसीय श्रमदान झाले हो...