नगरसेविकेचा स्तुत्य उपक्रम.....
विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका कविता इंगळे यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.त्या डॉ.भालचंद्र वाचनालयासाठी नगरसेविका कविता अनंत इंगळे यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासिकेसाठी स्पर्धा पुस्तके भेट देण्यात आली.त्या स्विकारतांना त्या बोलत होत्या. नगरसेविका सौ .कविता अनंत इंगळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंती निमित्ताने परळीचे वैभव असलेल्या डॉ.भालचंद्र वाचनालयातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट दिली. ही पुस्तके नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, शिक्षण सभा...