पोस्ट्स

इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  मधुकरराव विनायकराव तांबट यांचे अल्पशा आजाराने निधन परळी वैजनाथ/प्रतिनिधी  श्री कालिका देवी डिग्रस संस्थानचे कार्यकारी, कासार समाजाचे सेवक, सर्व परिचित व्यक्तिमत्व मधुकरराव विनायकराव तांबट यांचे आज रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी पहाटे ३.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  श्री मधुकरराव विनायकराव तांबट राहणार हालगे गल्ली, जुनी हैदराबाद बँकेच्या बाजूला परळी वैजनाथ यांचे आज रविवारी निधन झाले. कै.सुधीर व श्री नितीन (पप्पू)  तांबट  यांचे ते वडील होते. मधुकरराव तांबट हे अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने सर्व परिचित होते. परळी शहरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी सहभागी असत. अत्यंत प्रेमळ व लहान थोरापासून सर्वांना प्रेमाने बोलणारे मधुकरराव तांबट यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, चार बहिणी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.  या दुःखद घटनेमुळे तांबट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्य...

अभिष्टचिंतन विशेष लेख.......

इमेज
  समाजप्रबोधनकार "भीमयुगकार" : रानबा गायकवाड २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वीकृत केलेला मंगलमय दिन! याच दिवसाचा आणखी एक विलक्षण योग म्हणजे समाजप्रबोधनकार, साहित्यिक, संपादक रानबा गायकवाड यांचा जन्मदिवस! सर्वप्रथम त्यांना जन्मोत्सव निमित्ताने सम्यक मंगलकामना! वैचारिक अधिष्ठान आणि संस्कारांची शिदोरी:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपण लेखणी हाती घेतली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावलांनी पुनीत झालेल्या रयत शिक्षण संस्था सातारा परिसरात आपल्या आयुष्याची बांधणी केली. आपण पत्रकारिता क्षेत्राला जरी सेवा दिली असली तरी आपण आपल्यातील साहित्यिक-रंगकर्मी सतत जागा ठेवला. अनेक नाटकांमध्ये आपण अभिनय करून आपल्यातल्या नटाची साक्ष दिली; अनेक नाटकांचे अत्यंत सकस आणि अर्थपूर्ण असे नाट्यलेखनही केले आहे. 'भीमयुग': संविधानाचा गौरव आणि क्रांतीचा अविष्कार:- आपल्या सशक्त लेखणीतून साकारलेली आणि प्रतिभावंत सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेली 'भीमयु...

पुण्याच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने केला सामाजिक सेवेचा गौरव

इमेज
बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ;ना. पंकजाताई मुंडे डी. लिट. पदवीने सन्मानित पुण्याच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने केला सामाजिक सेवेचा गौरव पुणे ।दिनांक २४। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने आज शैक्षणिक क्षेत्रातील मानाची डी लिट (मानद डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मान केला. या गौरवाने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.     लोहगांव येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ आज मोठया थाटात पार पडला. ना. पंकजाताई मुंडे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. ना. पंकजाताई मुंडे हया राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असून पर्यावरण व पशुसंवर्धन खात्यामार्फत गेल्या वर्षभरात अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आहेत, याशिवाय  सामाजिक कार्यातही त्या सातत्याने अग्रेसर असतात.  या  कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी 'मानद डॉक्टरेट' (डी.लिट.) देऊन आज सन्मान केला.   या कार्यक्रमास अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कु...
इमेज
  हनुमान व्यायाम शाळेत भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी व नागरीकांनी सहभागी व्हावे; दत्ताप्पा ईटके गुरुजी   परळी वैजनाथ जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेत शहर व तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ संचालक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  25 जानेवारी हा दिवस जगभरात सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. सूर्यनमस्कार म्हणजे परिपूर्ण व्यायाम असल्याने विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना सुध्दा या व्यायाम प्रकारामुळे आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यास मदत होते. हनुमान व्यायाम शाळेतर्फे दर वर्षी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. याही वर्षी हनुमान व्यायाम शाळेत विनामूल्य होणाऱ्या या स्पर्धेत इयत्ता दहावी च्या आतील विद्यार्थ्यांसाठी गट व सर्वसामान्य गट अश्या दोन प्रकारात होणाऱ्या स्पर्धा रविवार दिनांक 25 जानेवारी, सायंकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहेत. सुदृढ व निरोगी शरीर राखण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक असून या स्पर्धेद्वारे...
इमेज
"वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक संभाजीनगरच्या पहाडे विधी महाविद्यालयाकडे संभाजीनगरचा आदित्य दराडे प्रथम, परळीची कु. लक्ष्मी जुनाळ द्वितीय, धर्मापुरीची कु.अक्षता दहिफळे तृतीय परळी वैजनाथ (दि.२४)-दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७६ व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून  जवाहर शिक्षण संस्थेच्या येथील वैद्यनाथ महाविद्यालयात  काल (दि.२३ जाने.) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा  उत्साहात संपन्न झाली.यात सांघिक पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या  संघाने जिंकले .तर स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम पारितोषिक (₹ ७०००/-व स्मृतिचिन्ह) याच महाविद्यालयाच्या आदित्य ज्ञानेश्वर दराडे याने पटकावले. द्वितीय पारितोषिक (₹ ५०००/- व स्मृतिचिन्ह) परळी येथील यजमान वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कु. लक्ष्मी महेश जुनाळ याने मिळवले, तर तृतीय पारितोषिक (₹३००० व स्मृतिचिन्ह) धर्मापुरी येथील कै. शंकरराव गुट्टे महाविद्यालयाच्या कु. अक्षता संतोष दहिफळे हिने जिंकले.  तर उत्तेजनार्थ (₹१०००/-)  ठेवण्यात आलेली तीन पारितोषिके क्रम...

धनंजय मुंडे यांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार

इमेज
परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित जागेवर सौर उर्जा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा; पहिल्या टप्प्यात  ५० मेगावॅटचा प्रकल्प सुरु होणार परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....              बीड जिल्ह्य़ातील परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे. या ठिकाणी एकूण 350 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आहे.         परळी वैजनाथ येथे जुने व नवे औष्णिक विद्युत केंद्र म्हणून एकूण आठ संच कार्यरत होते. त्यापैकी जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण पाच संच कायमस्वरूपी बंद करून ते संपूर्णतः निष्काशीत करण्यात आलेले आहेत. सध्या नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण तीन संच सुरू आहेत. संच क्रमांक १ व २ हे १९८० सालचे असल्यामुळे त्यांचे आयुर्मान कालबाह्य़ झाल्याचे स...

कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही.....

इमेज
  हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण नांदेड, दि. २३ जानेवारी :- नांदेड येथे उद्यापासून दोन दिवस “हिंद-दी-चादर” अंतर्गत शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य महानगर कीर्तन सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून प्रारंभ होऊन गुरुद्वारा चौक – महावीर चौक – वजिराबाद मार्केट – वजिराबाद चौक – तिरंगा चौक – रामसेतू दादरा – रवी नगर – नागार्जुन पब्लिक स्कूल – मामा चौक या मार्गाने मोदी मैदान, मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे. या मार्गावरील सर्व नागरिकांनी आपल्या घरांसमोर व दुकानांसमोर रंगीबेरंगी फुले, रांगोळी, विद्युत...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!