पोस्ट्स

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...

इमेज
खेळतांना आडबाजूला घेऊन गेला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; खळबळजनक घटना परळी वैजनाथ:प्रतिनिधी...       तालुक्यातील जिरेवाडी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मारुती मंदिर परिसरात खेळताना अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या आईने तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नव्हती. काही वेळानंतर अतिप्रसंग झालेल्या अवस्थेत रडत रडत ही मुलगी घरी आली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गावातीलच एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         जिरेवाडी येथे ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी गावातील मारोती मंदिराच्या परिसरात खेळण्यासाठी गेली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतरकाही वेळाने अतिप्रसंग झालेल्या अवस्थेत रडत रडत ही मुलगी घरी आली. तिच्यावर घडलेल्या अतिप्रसंगाची कहाणी तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. याबाबत मुलीच्या आईने परळी पोलीस ठाण्यात तक्र...
इमेज
परळीत मुलांसाठी १०८ पार्थिव शिवलिंग पूजनाचा गीता परिवाराचा अनोखा उपक्रम उत्साहात  परळी वैजनाथ :  प्रतिनिधी...       प. पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच संजय भैया मालपाणी आणि प्रमिला दीदी माहेश्वरी यांच्या प्रेरणेने गीता परिवार, परळी वैजनाथ यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त नर्मदा बाबा हनुमान मंदिर येथे मुलांसाठी १०८ पार्थिव शिवलिंग पूजनाचा विशेष धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडला. परळी शहरात मुलांसाठी अशा प्रकारचे आयोजन प्रथमच करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.       गीता परिवाराच्या वतीने मुलांसाठी पार्थिव शिवलिंग तयार करून देण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना मुलांचे ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत स्वागत करून कपाळी टिळा लावण्यात आला. पूजेसाठी टोपी, वस्त्र, माळ तसेच आवश्यक पूजासाहित्य उपलब्ध करून देण्यात आले. काही मुलांकडे पूजेसाठी आवश्यक साहित्य कमी असल्यास त्यांनाही ते साहित्य देण्यात आले.महाराज प्रसाद कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चार व विधीवत मार्गदर्शनाखाली मुलांच्या हस्ते पार्थिव शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. गीता परिवाराच्या...
इमेज
परळीत मराठी कामगार सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य-परीक्षा पॅड वाटप! परळी वैजनाथ: प्रतिनिधी...      मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (घड्याळ) प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय महेशदादा जाधव साहेब यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या मराठी कामगार सेनेच्या वतीने येथील अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात (नेहरू चौक, तळ) शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा पॅड (Exam Pad) वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. अभ्यासाला प्रोत्साहन आणि शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याच्या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मराठी कामगार सेनेचे परळी वैजनाथ शहर सचिव लक्ष्मीकांत बापू फुलारी आणि शहर उपसचिव राम भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शाळेतील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून रोज व्यायाम व शिस्त पाळावी, असा मोलाचा सल्ला या वेळी देण्यात आला. हातात परीक्षा पॅड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ...

वैद्यनाथ कॉलेजच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..

इमेज
तपोवनचे सुपुत्र शिवशंकर (अण्णा) कराड यांच्या निधनाने मोठी हानी नामांकित कुस्तीगीर, शेतकरी व समाजसेवक हरपल्याने बीड जिल्ह्यात शोककळा परळी वैजनाथ / तपोवन, प्रतिनिधी : तपोवन येथील नामांकित कुस्तीगीर, कर्तव्यनिष्ठ शेतकरी, समाजसेवक तथा क्रीडाप्रेमी शिवशंकर (अण्णा) कराड यांचे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाल्याने तपोवन परिसरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, कुस्तीप्रेमी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. शिवशंकर अण्णा कराड हे तपोवन व नागपिंपरी येथील मातीशी घट्ट नाते जपणारे एक प्रसिद्ध कुस्तीगीर होते. ग्रामीण भागातील कुस्ती परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी आपल्या कुस्ती कौशल्याच्या बळावर तपोवन, बीड जिल्हा आणि मराठवाड्याचे नाव उज्ज्वल केले.ते बीड जिल्हा कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.तसेच नागपिंपरी या गावचे माजी सरपंच होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट असे कामे केली आहेत. कुस्ती या प...
इमेज
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत ना. पंकजाताई मुंडे 'ॲक्शन मोडवर' ; मंत्रालयात ऑनलाईन बैठकीत घेतला आढावा शाळांचा दर्जा, स्वच्छतागृह व अन्य सुविधांच्या सद्यस्थितीचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्या ; आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा मुंबई, दि. १ : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, कंपाऊंड वॉल आदींची सद्यःस्थितीबाबत पाहणी करून येत्या पाच तारखेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी दिल्या. तसेच जालना जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शाळा, अंगणवाडी, आधुनिक ग्रंथालये आणि क्रीडांगणांच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्यांची दुरुस्ती तसेच नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत तसेच जालनाई सिल्...
इमेज
अर्ध्या तिकिटाची सवलत : एसटीच्या स्मार्ट कार्डचा पहिल्याच दिवशी बोजवारा! ‘सर्व्हर डाऊन’चा घोळ; कार्ड रिचार्ज अभावी पात्र प्रवाशांना पुर्ण तिकीटाचा भुर्दंड परळी वैजनाथ: प्रतिनिधी...      एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेचा पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे बोजवारा उडाल्याचे बघायला मिळाले. कार्डमध्ये पुरेशी रक्कम नसल्यास रिचार्ज करण्याची सुविधा बसमध्येच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना आगाराच्या दारातच रिचार्जसाठी धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे, बसचालक-वाहकांकडून कार्ड रिचार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास ‘सर्व्हर डाऊन आहे’ असे सांगितले जात असल्याच्या दिवसभर असंख्य तक्रारी आल्या आहेत. परिणामी कार्डमध्ये शिल्लक रक्कम नसलेल्या महिलांना अर्ध्या तिकिटाचा लाभ न मिळता नाईलाजाने पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.      एसटी बसने नियमित प्रवास करणाऱ्या आणि प्रवासात सवलत घेणाऱ्या नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड काढण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य म...

खगोलीय निरीक्षणाचा अनोखा योग....

इमेज
पश्चिम आकाशात दिसला तेजस्वी ‘गोलाकार ठिपका’; खगोलीय दृश्याने वेधले नागरिकांचे लक्ष परळी वैजनाथ : प्रतिनिधी...   आज मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पश्चिम आकाशात अत्यंत तेजस्वी, मोठा गोलाकार प्रकाशबिंदू दिसून आल्याने नागरिकांचे लक्ष आकाशाकडे वेधले गेले. अनेकांनी या चमकदार वस्तूचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले.        मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम दिशेला दिसणारा हा तेजस्वी प्रकाशबिंदू शुक्र ग्रह असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला शुक्र सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात अत्यंत तेजस्वी दिसत आहे. १ सप्टेंबर रोजी शुक्र आणि कन्या राशीतील तेजस्वी तारा स्पिका हे पश्चिम आकाशात एकमेकांच्या जवळ दिसण्याची खगोलीय घटना आहे.           भारताच्या आकाश निरीक्षणाच्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी शुक्राची दृश्यता चांगली असून तो रात्री सुमारे ९.०९ वाजेपर्यंत दिसू शकतो. त्यामुळे रात्री ८ वाजता पश्चिम दिशेला दिसलेला हा प्रखर प्रकाशबिंदू शुक्राशी जुळतो. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात शुक्राची चमक आणखी वाढणार असून १८...