पोस्ट्स

पाच भावंडांच्या संघर्षातून उभा राहिलेला सौर ऊर्जा क्षेत्रातील यशस्वी प्रवास...

इमेज
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पाच भावंडांच्या जिद्दीला ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान  प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते गौरव छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  येथील ‘द ट्रिट इंपीरियल हॉटेल’ (The Treat Imperial Hotel) येथे Reseal.in या संस्थेच्या वतीने नुकताच अत्यंत दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सौर ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय व पथदर्शी कामगिरी करणाऱ्या PBR Construction & Renewable Energy Pvt. Ltd. या ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शून्यातून विश्व निर्माण कसे करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे PBR Construction & Renewable Energy Pvt. Ltd. ची वाटचाल आहे. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना, केवळ पाच भावंडांनी केलेल्या अफाट मेहनत, जिद्द आणि अतुट एकीच्या बळावर हा व्यवसाय उभा केला आहे. सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी आपली सुरुवात केली. आज ही कंपनी सौर ऊर्जा (Solar Energy) क्षेत्रा...

बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे रुंदीकरण होणार; १०४ कोटीची निविदा प्रसिद्ध

इमेज
आश्वासनाची पूर्ती ; ना. पंकजाताई मुंडेंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे रुंदीकरण होणार; १०४ कोटीची निविदा प्रसिद्ध बीड।दिनांक १६। परळी मतदारसंघातील बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्ता रुंदीकरणाला आता गती येणार असून यासाठी १०४ कोटीची निविदा  तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे, या कामासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.    निवडणुक प्रचाराच्या वेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत  बर्दापुर ते लोखंडी सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी केली होती, हा रस्ता अरूंद असल्याने यावर वारंवार अपघात झाले होते, त्यामुळे ही मागणी पुढे आली होती, यावर गडकरी यांनी रस्त्यासाठी लवकरच निधी देऊन काम सुरू करू असे आश्वासन दिलं होते. ना.पंकजाताईंनी या मागणीसाठी गडकरी यांची काही महिन्यापुर्वी दिल्ली येथे भेटही घेतली होती. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यां...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मंजुरी आणि १०४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध

इमेज
परळी मतदारसंघातील लोखंडी सावरगाव ते बर्दापूर फाटा रस्ता आता होणार चौपदरी, धनंजय मुंडेंच्या मागणीला यश केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मंजुरी आणि १०४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत धनंजय मुंडेंनी दिल्लीत नितीन गडकरी यांच्याकडे केली होती मागणी परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील बीड व लातूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ - ब मधील लोखंडी सावरगाव ते लातूर रोडवरील बर्दापूर फाटा या दोन पदरी रस्त्याचे आता चौपदरीकरण होणार असून, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कामास धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार मंजुरी दिली असून सुमारे १७.५० किमी लांबीच्या चौपदरीकरण कामासाठी १०४.४९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, तसेच या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याने लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.  वाढती भरधाव वाहतूक आणि रस्त्यालगतची गावे यामुळे बीड व लातूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील ...

श्री प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवीचे दर्शन...

इमेज
शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सपकाळ यांचा परळी येथे सत्कार श्री प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवीचे दर्शन घेत बीड जिल्ह्यातील दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी साकडे परळी वैजनाथ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सपकाळ यांनी परळी वैजनाथ येथे भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा ताई अंधारे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा शाल, श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, उपतालुकाप्रमुख महेश केंद्रे, बीड जिल्हा महिला संघटक मीरा ताई नवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारानंतर अशोक सपकाळ यांनी परळी वैजनाथ येथील श्री प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच योगेश्वरी देवीचेही दर्शन घेण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा आणि जिल्ह्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी श्री प्रभू वैद्यनाथ व योगेश्वरी देवीला साकडे घाल...

आभाळाकडे डोळे, अल्लाहकडे साकडे; पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुवा

इमेज
पावसासाठी परळीत मुस्लिम बांधवांची सामूहिक दुआ आणि नमाज ; सलग तीन दिवस इस्तिस्का नमाज आभाळाकडे डोळे, अल्लाहकडे साकडे; पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुवा परळी : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी शेतीपिकांवर संकट निर्माण झाले असताना परळी शहरात मुस्लिम बांधवांनी पावसासाठी सामूहिक प्रार्थनेचा आधार घेतला आहे. परळी येथील ईदगाह मैदानावर सलग तीन दिवसांपासून ‘नमाझ-ए-इस्तिस्का’ आणि विशेष दुआ आयोजित करण्यात येत आहे. पावसासाठी करण्यात येणाऱ्या या सामूहिक प्रार्थनेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मुस्लिम बांधव सहभागी होत आहेत. पावसासाठी करण्यात आलेल्या या प्रार्थनेदरम्यान अनेक भाविक अत्यंत आर्ततेने अल्लाहकडे याचना करताना दिसून आले. “हे परवरदिगारा, रहमत की बारीश आता फरमा आणि आम्हा सर्वांना या संकटातून वाचव,” अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. अशा परिस्थितीत परळीतील मुस्लिम बांधवांनी पावसासाठी केलेली ही सामूहिक प्रार्थना धार्मिक सलोखा आणि निसर्गाविषयीची ...

अधिसूचना निघाली नसल्याने पेच?

इमेज
  जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांची फरफट! तहसील की न्यायालय? अधिकार नेमका कोणाचा; नागरिक संभ्रमात परळी वैजनाथ | प्रतिनिधी नवीन कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आदेश देण्याचे अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या तरतुदीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली अधिसूचना अथवा राजपत्र केंद्र सरकारकडून अद्याप जारी करण्यात आले नसल्याने न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परळी येथील न्यायालयाकडून अशा प्रकारची प्रकरणे दाखल करून घेण्यास स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, “जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार न्यायालयाकडे वर्ग झाले आहेत,” असे सांगून तहसील कार्यालयाकडूनही नागरिकांना परत पाठविले जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक जुन्या जन्म-मृत्यू नोंदी आवश्यक असलेल्या नागरिकांना शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, वारसा हक्क, पासपोर्ट, आधार व इतर विविध प्रशासकीय कामांसाठी जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मा...

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा*

इमेज
  नाळवंडीतील पिडित चिमुकलीला न्याय देऊ ना. पंकजा मुंडेंचे बीड एसपींना निर्देश ; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा बीड दि. १२ --- नाळवंडी ता. पाटोदा येथील आठ वर्षाच्या चिमुकलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक असून यातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती कोर्टात चालवावे असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.     या प्रकरणी आज ना. पंकजाताईंनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.  नाळवंडी गावातील एका आठ वर्षाच्या चिमकुलीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला. या घटनेने पिडीत चिमुकलीचे  कुटुंब भयभीत झाले आहे. घटनेतील  आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीवर कठोरात कठोर शासन करावे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. ••••